मेट्रो ७, मेट्रो २ अ चा दुसरा टप्पा नव्या वर्षात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो ७, मेट्रो २ अ चा 
दुसरा टप्पा नव्या वर्षात?
मेट्रो ७, मेट्रो २ अ चा दुसरा टप्पा नव्या वर्षात?

मेट्रो ७, मेट्रो २ अ चा दुसरा टप्पा नव्या वर्षात?

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ आणि दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो २ अ या दोन्ही मार्गांच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. हे मार्ग नव्या वर्षात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे लक्ष्य एमएमआरडीएने ठेवले आहे. या मार्गांच्या ‘रिसर्च डिझाईन ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन’ने (आरडीएसओ) चाचणी पूर्ण केल्या असून एमएमआरडीएला त्याबाबतचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि सुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रयत्न एमएमआरडीएकडून सुरू आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ या मार्गाचे काम आठ वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. या दोन्ही मार्गांचा पहिला टप्पा २ एप्रिल रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. या मार्गांचा दुसरा टप्पा ऑगस्टमध्ये पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष्य होते; मात्र नियोजित कामे वेळेत पूर्ण न झाल्याने ही डेडलाईन लांबणीवर गेली असून आता दुसऱ्या टप्प्यातील कामे डिसेंबर अखेरीस पूर्ण करण्याचे लक्ष्य एमएमआरडीएने ठेवले आहे, तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दुसरा टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी सांगितले.
.......