मेट्रो 2 अ आणि 7 मार्गासाठी आणखी मेट्रो 6 गाड्या येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो 2 अ आणि 7 मार्गासाठी आणखी मेट्रो 6 गाड्या येणार
मेट्रो 2 अ आणि 7 मार्गासाठी आणखी मेट्रो 6 गाड्या येणार

मेट्रो 2 अ आणि 7 मार्गासाठी आणखी मेट्रो 6 गाड्या येणार

sakal_logo
By

‘मेट्रो २ अ’ आणि ७ मार्गासाठी आणखी सहा गाड्या
दुसऱ्या टप्प्यातील वाहतुकीसाठी उपयोगी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ‘मेट्रो ७’ आणि दहिसर पश्चिम ते डी. एन. नगर ‘मेट्रो २ अ’ अशा दोन्ही मार्गांच्या दुसऱ्या टप्प्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. दोन्ही मार्ग नवीन वर्षात प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे प्रयत्न एमएमआरडीए करत आहे. दोन्ही मार्गांसाठी आवश्यक असलेल्या सहा मेट्रो गाड्या १५ ते २० दिवसांत मुंबईत दाखल होणार आहेत. तांत्रिक कारणांमुळे त्यांना विलंब झाल्याचे सांगण्यात आले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ मार्गाचे काम आठ वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. दोन्ही मार्गांचा पहिला टप्पा २ एप्रिल रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. त्या मार्गावर आवश्यक असलेल्या २२ गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. आणखी सहा गाड्या तयार करण्याचे काम रखडल्याने एमएमआरडीएला त्या वेळेत मिळू शकलेल्या नाहीत. गाड्या वेळेत मिळाव्यात म्हणून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी नुकतीच बैठक घेतली. बैठकीत उर्वरित सहा मेट्रो गाड्या तातडीने मिळाव्यात यासाठी चर्चा झाली. त्यावर कंपनीने १५ ते २० दिवसांत सहा गाड्या देण्याचे आश्वासन दिले आहे. गाड्या मुंबईत आल्यानंतर त्यांची जोडणी होईल. त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.