भारती सिंहच्या अडणीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारती सिंहच्या अडणीत वाढ
भारती सिंहच्या अडणीत वाढ

भारती सिंहच्या अडणीत वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : दोन वर्षांपूर्वीच्या अमली पदार्थ प्रकरणात विनोदी कलाकार भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (एनसीबी) विशेष न्यायालयात २०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामुळे भारतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी याच प्रकरणात दोघांना अटक झाली होती. सध्या दोघेही जामिनावर आहेत.

एनसीबीने आज विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी नोव्हेंबर २०२० मध्ये एनसीबीने छापा टाकून घरातून सुमारे ८६.५ ग्रॅम गांजा जप्त केला होता. दोघांनीही गांजाचे सेवन केल्याची कबुली दिल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. एनडीपीएस कायद्यानुसार त्यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. विशेष न्यायालयात त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. आता नियमित न्यायालयात लवकरच आरोपपत्राची दखल घेतली जाईल आणि आरोप निश्चित करण्यात येईल, असे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले.