वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये अवर सचिव स्तरावरील अधिकाऱ्याने एका उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याला ‘मला बरे वाटत नाही. मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव,’ अशी मागणी केली होती. त्याचबरोबर ज्यांच्या दालनात हा निंदनीय प्रकार घडला, तेथेच एका मंत्र्याच्या अवर सचिवानेही अशा पद्धतीचे हीन वक्तव्य केले होते. त्या ठिकाणी उपसचिव देखील उपस्थित होते. या सर्वांवर कडक कारवाई करण्याची मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित महिला अधिकाऱ्यांनी स्वतःचा तक्रार अर्ज संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे तसेच त्यांच्या सचिवांना देखील दिला आहे; परंतु त्यांच्याकडून याबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने माझ्याकडे ही माहिती आली आहे. संबंधित महिला अधिकाऱ्यांकडून मी माहिती घेतली असून, त्यांच्याकडून सर्व ऐकून घेतले आहे, असे गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्याला या कार्यातून तात्पुरते कार्यमुक्त केले पाहिजे. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनी चौकशी करावी, अशा प्रकारचे निर्देशही गोऱ्हे यांनी दिले आहेत.