मेट्रो कारशेडला विरोध कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो कारशेडला विरोध कायम
मेट्रो कारशेडला विरोध कायम

मेट्रो कारशेडला विरोध कायम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मेट्रो ९ कारशेडसाठी मोर्वो, रायमुर्दे आणि मुर्दे या तीन गावांतील जमिनीचे अधिग्रहण करण्याची नोटीस नगररचना ठाणे शाखेच्या सहायक संचालकांनी काढली आहे. यावर नागरिकांना हरकती नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, कारशेड शेतजमिनीवर उभारण्याऐवजी मिठागराच्या जागेवर उभारण्यात यावे, अशी हरकत गावकऱ्यांकडून नोंदवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मेट्रो ९ मार्गाची कारशेड मिरा-भाईंदरमध्ये प्रस्तावित आहे. या कारशेडला मोर्वो, रायमुर्दे आणि मुर्दे या तीन गावांतील स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याची दखल घेत नुकतीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत गावकऱ्यांची बैठक झाली होती. यामध्ये मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सर्वेक्षण अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र काही दिवसांतच जमिनीचे अधिग्रहणाच्या नोटीस काढण्यात आल्याने ग्रामस्थांचे वकील गॉडफ्रे पिमेंटा यांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारने स्थानिकांसोबत बैठकीत फसवणूक करणारी माहिती दिली असल्याचा आरोपही पिमेंटा यांनी केला आहे. मेट्रोसाठी मिठागरे आणि इतर जमीन उपलब्ध आहे. मेट्रो मार्ग सरळ रेषेत होणार होता. मात्र, आता विकसकांच्या फायद्यासाठी तो वळवण्यात आला आहे. जमीन अधिग्रहणाच्या नोटिशीवर आम्ही लवकरच हरकत नोंदवणार आहोत, असे पिमेंटा म्हणाले.