शिक्षक संघटनांना बैठकीचे निमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक संघटनांना बैठकीचे निमंत्रण
शिक्षक संघटनांना बैठकीचे निमंत्रण

शिक्षक संघटनांना बैठकीचे निमंत्रण

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : मागील २० दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेल्या शिक्षकांना १ नोव्हेंबर रोजी सरकारने बैठकीला बोलावले आहे. या बैठकीला शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत शिक्षक आमदार आणि संस्थाचालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शिक्षक संघटनांना उपस्थित राहण्याचे रीतसर निमंत्रण मिळाल्याची माहिती शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक संजय डावरे यांनी दिली.
१५ नोव्हेंबर २०११ व ४ जून २०१४ या शासन निर्णयातील वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू करत १०० टक्के वेतनाच्या मागणीसाठी राज्यातील विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी मागील २० दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून अनुदानासंदर्भात शिक्षण विभागाने काढलेला १६ सप्टेंबर २०१९ चा शासन निर्णय रद्द करून १५ नोव्हेंबर २०११ व ४ जून २०१४ च्या शासन निर्णयातील वेतन अनुदानाचे सूत्र लागू करून १०० टक्के वेतन देण्यात यावे, ही प्रमुख मागणी केली जात आहे. शिक्षकांच्या आंदोलनाला दखल घेत सरकारकडून १ नोव्हेंबरला बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यात शिक्षकांच्या मागणीवर सखोल चर्चा व निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.