राम नदीकाठच्या प्रकल्पाच्या स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राम नदीकाठच्या प्रकल्पाच्या स्थगिती
राम नदीकाठच्या प्रकल्पाच्या स्थगिती

राम नदीकाठच्या प्रकल्पाच्या स्थगिती

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : पुण्यातील बावधन परिसरात राम नदीकाठी बांधण्यात येणाऱ्या क्षेपणभूमी आणि कचरा विलगीकरण प्रकल्पाच्या बांधकामाला मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. या प्रकल्पामुळे नदीच्या पाण्यावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे, असा दावा करण्यात आला आहे.
पर्यावरणप्रेमी डॉ. स्नेहल दोंदे आणि भाग्यश्री महाले यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्या. माधव जामदार आणि न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीने याचिकेवर बाजू मांडण्यासाठी अवधी मागण्यात आला. पुणे महापालिकेच्या वतीने कोणीही हजर नव्हते. त्यामुळे न्यायालयाने महापालिकेला नोटीस बजावली असून भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली नाही, तरीही महापालिकेच्या वतीने यावर काम सुरू केले आहे. यामुळे नदीचे आकारमान कमी झाले असून पर्यावरण सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. राम नदी ही मुळा नदीची उपनदी आहे.