पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड
पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड

पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त मुंबईत नेहरू युवा केंद्राद्वारे एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यात मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी सहभागी झाल्या होत्या.
मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित या कार्यक्रमाला मुंबईच्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडेय, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर सुधीर पुराणिक, नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे क्षेत्रीय संचालक डॉक्टर कार्तिकेयन, मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या प्राध्यापिका वासंती कांदीवरन आदी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी चौधरी म्हणाल्या, की सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकसंध भारताचे स्वप्न बघितले होते आणि त्यांच्या कार्यामुळेच ते स्वप्न सत्यात उतरले. त्याचबरोबर भारतात प्रशासकीय सेवा सुरू करण्याचे श्रेयदेखील सरदार वल्लभभाई पटेल यांनाच जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांचे हे कार्य देश नेहमीच लक्षात ठेवेल आणि त्यांच्या कार्यामुळे युवा पिढीला सातत्याने प्रेरणा मिळेल.
...
कार्यालयांतून अभिवादन
मुंबईतील शिक्षण विभागाच्या प्रत्येक कार्यालयात आज सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. एसएनडीटी विद्यापीठात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. या वेळी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव म्हणाल्या, की सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम केले, तसेच आपण सर्व एकत्र येऊन एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी चांगले कार्य करू या आणि विद्यापीठाला नवीन उंचीवर नेऊन ठेवू या, असा विश्वास व्यक्त केला.