धारावी पुनर्विकास निविदा प्रक्रियेला मुदतवाढं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावी पुनर्विकास निविदा प्रक्रियेला मुदतवाढं
धारावी पुनर्विकास निविदा प्रक्रियेला मुदतवाढं

धारावी पुनर्विकास निविदा प्रक्रियेला मुदतवाढं

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबविण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढीनुसार इच्छुक कंपन्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत निविदा भरता येणार आहेत. गेल्या १८ वर्षांपासून रखडलेल्या धारावी पुनर्विकासासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार इच्छुक कंपन्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत निविदा भरता येणार होत्या; मात्र कंपन्यांनी पाठ फिरवल्याने निविदा प्रकियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निविदापूर्व बैठकीला यापूर्वी पुनर्वसन प्रकल्पात स्वारस्य असलेल्या आठ कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. या बैठकीत डीआरपीने झोपडीधारकांचे पुनर्वसन ७ वर्षांत आणि संपूर्ण प्रकल्प १७ वर्षांत पूर्ण करण्याची अट निविदेत दिल्याबद्दल हरकत नोंदवली होती. तसेच ७ वर्षांत झोपडीधारकांचे पुनर्वसन पूर्ण होणे शक्य नसल्याने हा कालावधी १० ते १२ वर्षांनी वाढविण्याची मागणी निविदापूर्व बैठकीत विकसकांनी केली होती. या मागणीचा प्रकल्पाने विचार केला नसून, निविदेत हीच अट कायम ठेवली आहे. यापूर्वीच्या निविदेत ७ लाख झोपडीधारक पात्र असल्याचा उल्लेख रद्द केला आहे. मुदतवाढ निविदेत धारावीत साडेतीन लाख ते चार लाख झोपडीधारक पात्र असल्याचा उल्लेख करण्यात करण्यात आला आहे. याशिवाय अपात्र रहिवाशांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.