एसटीचे बांधा, वापरा, हस्तांतरित करा योजना रखडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीचे बांधा, वापरा, हस्तांतरित करा योजना रखडली
एसटीचे बांधा, वापरा, हस्तांतरित करा योजना रखडली

एसटीचे बांधा, वापरा, हस्तांतरित करा योजना रखडली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : एसटीने राज्यातील १४ ठिकाणी बांधा वापरा आणि हस्तांतरित करा योजनेंतर्गत राज्यातील एसटी डेपोचा कायापालट करण्याची घोषणा केली होती. मोठ्या शहरातील जागा असलेल्या डेपोमध्ये विमानतळावरील सुविधेप्रमाणे एसटी प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रयत्न एसटी प्रशासनाचा होता; मात्र तब्बल तीन वेळा निविदा काढूनही १४ पैकी १३ डेपोंच्या विकासाच्या निविदेकडे विकासकांनी पाठ फिरवली; मात्र पनवेल डेपोच्या विकासाचे काम शहापूर भाई पालमजी या कंपनीला देण्यात आले; मात्र अद्याप तेही काम सुरू न झाल्याने एकूणच बांधा वापरा हस्तांतरणाची योजनाच रखडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

पनवेल डेपोच्या विकासासाठी २६५ कोटींची निविदा काढण्यात आली होती. सुमारे तीन वर्षे होऊनही हा प्रकल्प अद्याप सुरू झाला नाही. परिणामी, पनवेल डेपोतील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे आता पनवेल डेपो उभारणीसाठी पनवेल प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. प्रकल्पाला उशीर होत असल्याने आता प्रकल्पाची किंमतसुद्धा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; मात्र प्रत्यक्षात पनवेल महापालिकेने पनवेल डेपोच्या विकासाचा नकाशा बदलवण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे नकाशा बदलून महापालिकेला नव्याने मंजुरीही मागितली; मात्र अद्याप महापालिकेने मंजुरी दिली नसल्याने पनवेल डेपोचे काम रखडले असल्याचे एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले आहे.
-------
या ठिकाणी कंत्राटदारांचा प्रतिसाद नाही
आतापर्यंत एसटी महामंडळाने तीन वेळा निविदा काढल्या; मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने राज्यातील अनेक डेपो विकासापासून वंचित आहेत. त्यामध्ये बोरिवली, नाशिक महामार्ग, धुळे, जळगाव, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नांदेड, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, भिवंडी, कल्याण यांचा समावेश आहे.