दहिसर-मिरा रोड उड्डाणपुलाची अडीच हजार कोटींची निविदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहिसर-मिरा रोड उड्डाणपुलाची अडीच हजार कोटींची निविदा
दहिसर-मिरा रोड उड्डाणपुलाची अडीच हजार कोटींची निविदा

दहिसर-मिरा रोड उड्डाणपुलाची अडीच हजार कोटींची निविदा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फुटून प्रवास सुखकर व्हावा, यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. येथील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पालिकेने दहिसर ते मिरा रोड दरम्यानच्या खाडीकिनारी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. उड्डाणपूल बांधण्यासाठी सुमारे अडीच हजार कोटींचा खर्च होणार आहे. यासाठीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
दहिसर कांदळपाडा ते मिरा रोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत या पुलाचा विस्तार राहणार आहे. हा पूल ४५ मीटर रुंद आणि ४.०६ किमी लांबीचा असणार आहे. पूल चार मार्गिकेचा बांधण्यात येणार असून याचा बराचसा भाग हा मिठागरे, कांदळवन आणि खाडी किनाऱ्यावरून जाणार आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या परवानग्याही घ्याव्या लागणार आहेत. या परवानग्या कंत्राटदारालाच घ्याव्या लागणार असून परवानग्या घेऊन कंत्राटदाराला हे काम ४२ महिन्यांत पूर्ण करायचे आहे. या पुलामुळे २० ते २५ मिनिटांची बचत या पुलामुळे होईल, असे पूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
...
जमीन संपादनाचा खर्च
पुलासाठी वापरण्यात येणारी अधिकतर शासकीय जमीन असून काही जमीन संपादन करावी लागणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यातील सुमारे ४०० ते साडेचारशे कोटी रुपये हे जमीन संपादन करण्यासाठी खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र हे सर्व काम कंत्राटदारालाच करावे लागणार असल्याने पालिकेचा भार हलका होणार आहे.