महावितरण भरतीतील उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण भरतीतील 
उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
महावितरण भरतीतील उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत

महावितरण भरतीतील उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : महावितरण कंपनीने उपकेंद्र सहायक पदाची भरती प्रक्रिया राबविली; मात्र गेल्या दोन वर्षांपासून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी न झाल्याने एक हजार २९ उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महावितरण प्रशासनाने तातडीने सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी शेकडो उमेदवारांनी वांद्रे येथील महावितरणच्या ‘प्रकाशगड’ या मुख्यालयासमोर आंदोलन केले.
महावितरण प्रशासनाने २०१९ मध्ये दोन हजार २९२ उपकेंद्र सहायक पदाची भरती प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार परीक्षेनंतर महावितरणने निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली. यानंतर निवड यादी १ व २ डिसेंबर २०२० ला कागदपत्रांची पडताळणी करून काही उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली; मात्र अद्यापही प्रतीक्षा यादीतील एक हजार २९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली नसल्याने त्यांना नियुक्ती मिळालेली नाही. नोकरी मिळावी यासाठी उमेदवार दोन वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्यात यावी, यासाठी उमेदवारांनी अनेक वेळा आंदोलने केली; मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर संतप्त उमेदवारांनी बुधवारी (ता.२) वांद्रे येथील प्रकाशगड कार्यालयासमोर आंदोलन केले. महावितरण प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने उमेदवार रात्रीपर्यंत कार्यालयाबाहेर बसून होते.