विद्युत सहायकांच्या प्रमाणपत्रांची आजही पडताळणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत सहायकांच्या 
प्रमाणपत्रांची आजही पडताळणी
विद्युत सहायकांच्या प्रमाणपत्रांची आजही पडताळणी

विद्युत सहायकांच्या प्रमाणपत्रांची आजही पडताळणी

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : विद्युत सहाय्यक या संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची परिमंडलनिहाय पडताळणी गुरुवारी (ता.३) करण्यात येणार आहे. उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी स्वतः परिमंडल कार्यालयांमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जे उमेदवार पडताळणीसाठी हजर राहणार नाहीत, त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे.
महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची परिमंडलनिहाय पडताळणी मागील चार दिवसांपासून करण्यात येत आहे. यामध्ये प्रतीक्षा यादीतील काही उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.
परिमंडलनिहाय प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये स्वतः उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी करणे अनिवार्य आहे. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळवर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे.