छबिलदास सभागृहात सिलिंडरचा स्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छबिलदास सभागृहात 
सिलिंडरचा स्फोट
छबिलदास सभागृहात सिलिंडरचा स्फोट

छबिलदास सभागृहात सिलिंडरचा स्फोट

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : दादर येथील प्रसिद्ध छबिलदास सभागृहामध्ये बुधवारी (ता. २) पहाटे एलपीजी सिलिंडरच्या स्फोटात भीषण आग लागली. या घटनेत जीवितहानी टळली असली तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरत सिंग (२६), जावेद अली (३८), गोपाल साहू (५०) अशी जखमींची नावे आहेत. सर्वांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

छबिलदास शाळेमधील सभागृहात बुधवारी पहाटेच्या सुमारास एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. सिलिंडर स्फोटाच्या आवाजाने आसपासच्या नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली. स्फोटामुळे सभागृहातून उडालेल्या वस्तू खाली उभ्या असलेल्या वाहनांवर आदळल्याने त्यांचेही नुकसान झाले. आसपासच्या नागरिकांनी तातडीने सभागृहातील तसेच आजूबाजूला असलेल्यांना इमारतीच्या खाली उतरवले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने, पोलिस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर तातडीने आग विझवण्यास सुरुवात केली.
अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.