गोखळे रोड बंद झाल्याने गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोखळे रोड बंद झाल्याने गैरसोय
गोखळे रोड बंद झाल्याने गैरसोय

गोखळे रोड बंद झाल्याने गैरसोय

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल कामासाठी बंद करण्यात आला आहे. यानंतर वाहतुकीसाठी काही पर्याय देण्यात आले असले, तरी पायी जाणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची यामुळे गैरसोय होत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेचा दक्षिणेकडे जाणारा रेल्वे पूल वापरासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.


विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेचा दक्षिणेकडे जाणारा रेल्वे पूल वापरण्याचा प्रस्ताव अंधेरी पूर्व ते पश्चिमेला जोडणारा गोखले रोड ब्रिज बंद करण्याच्या हेतूने मुंबई महापालिकेने घेणे गरजेचे असल्याचे वॉच डॉग फाऊंडेशनने म्हटले आहे. लोकांना विश्वासात न घेता किंवा त्यांना पूर्वकल्पना न देता घेतलेल्या अलीकडच्या काळातील सर्वांत वाईट निर्णयांपैकी एक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सध्याच्या गोखले पुलाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला दोन उड्डाणपूल बांधले आहेत. हा निर्णय पूर्णतः चुकीचा असून त्यामुळे या परिसरातील नियोजन फसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गोखले पुलाच्या पूर्वेला उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय सर्वप्रथम घेतलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची गरज आहे. गोखले रोड पुलाचा काही भाग यापूर्वी कोसळला होता. त्यामुळे त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोखले पुलाच्या पूर्वेकडे बांधकाम सुरू असलेल्या नवीन उड्डाणपुलासाठी किमान दोन वर्षे कालावधी लागणार आहे. याचा पूर्व आणि पश्चिम कनेक्टिव्हिटीवर प्रचंड परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा अंधेरी सबवे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असेल, तेव्हा गोंधळ निर्माण होईल. यावर उपाय म्हणून राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने पश्चिम रेल्वेकडे त्याच्या दक्षिणेकडे जाणाऱ्या‍ रेल्वे पुलाला शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वापरासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव देणे गरजेचे आहे, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनचे प्रमुख गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.