तरुणांनी आयटी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यावे ः पद्मश्री वेंबू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांनी आयटी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यावे ः पद्मश्री वेंबू
तरुणांनी आयटी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यावे ः पद्मश्री वेंबू

तरुणांनी आयटी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यावे ः पद्मश्री वेंबू

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : देशातील आयटी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासह शिक्षण, कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी आपल्या मातीतील तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी आपले करिअर हे आयटी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात निवडून देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि सीईओ पद्मश्री श्रीधर वेंबू यांनी स्वदेशी जागरण मंचच्या कार्यक्रमात केले. वांद्रे येथील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) येथे स्वदेशी जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माहिती तंत्रज्ञान शक्तीचा वापर करून खास भारतीय पद्धतीने भारताचा विकास करणे’ या विषयावर ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या वेळी एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिष चौहान, स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय समन्वयक आर. सुंदरराम उपस्थित होते.

पद्मश्री वेंबू पुढे म्हणाले, की देशाच्या आर्थिक उलाढालीत तरुणांना मोठे योगदान देण्यासाठी मोठे आकाश त्यांची वाट पाहत आहे. कृषी आणि ग्रामीण भागातील विकासासाठी आयटी क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरू शकते. गावखेड्यांपासून ते शहरापर्यंत आज शॉपिंग, पायाभूत सुविधा आदींमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच लॅब स्वॉफ्टवेर, टूल मेकिंग, चीप तयार करणे या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्पादन क्षेत्र मोकळे आहे. जगातील अनेक देशांच्या तुलेत भारताची क्षमता किती तरी पटीने अधिक आहे, याबद्दल वेंबू यांनी श्रोत्यांना माहिती दिली. आपल्या देशातील जनसंख्येचा सुयोग्य वापर प्रत्येक राज्याने केल्यास पाच ट्रिलियन डॉलरचे आपले स्वप्न आपण साकार करू शकू, असेही ते म्हणाले. ट्रेड डेफिसिट कसा कमी करता येईल, डेफिसट उभा करणारे उद्योग, वस्तू, सेवा यांचे स्वदेशी संस्करण उभे केले पाहिजेत याबद्दलही त्यांनी विवेचन केले. दरम्यान, स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय संयोजक सुंदरम यांनी स्वावलंबी भार अभियानाची गरज व आर्थिक क्षेत्रात पूर्णपणे आत्मनिर्भर होण्याकरिता समाजाचा सहभाग किती आवश्यक आहे हे सांगितले. एसएसईचे एमडी आशिष चौहान यांनीही उपस्थितांना संबोधित केले.