मालेगाव खटल्यात आणखी फितूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालेगाव खटल्यात आणखी फितूर
मालेगाव खटल्यात आणखी फितूर

मालेगाव खटल्यात आणखी फितूर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यात शनिवारी (ता. ५) आणखी एका साक्षीदाराने आपली साक्ष फिरवली. यामुळे विशेष न्यायालयाने त्याला फितूर घोषित केले.

शनिवारी न्यायालयात एक निवृत्त लष्करी अधिकारी साक्ष देण्यासाठी आले होते. मात्र, मी तपास अधिकाऱ्यांना कोणताही जबाब दिला नाही. मी कोणत्याही आरोपीला ओळखत नाही आणि कोणत्याही आरोपीची मला माहिती नाही, अशी जबानी त्यांनी दिली. त्यानंतर विशेष न्यायालयाने त्यांना फितूर घोषित केले. शुक्रवारीदेखील एक साक्षीदार फितूर घोषित झाला होता. यामुळे आता एकूण फितूर साक्षीदारांची संख्या २९ झाली आहे. विशेष न्यायालयात सध्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची नियमित सुनावणी सुरू आहे. आता १०४ साक्षीदारांची जबानी नोंदविणे बाकी आहे. उच्च न्यायालयाने खटल्याची नियमित सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एटीएस आणि एनआयएला एकत्रितपणे तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. खटल्यात फितूर होणाऱ्या साक्षीदारांबाबत चिंता व्यक्त करणारी याचिका न्यायालयात पीडित व्यक्तींनी केली आहे. न्यायालयाने देखील याचिकेची दखल घेतली आहे.