माझगाव, मालाड, अंधेरीतील हवा प्रदूषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझगाव, मालाड, अंधेरीतील हवा प्रदूषित
माझगाव, मालाड, अंधेरीतील हवा प्रदूषित

माझगाव, मालाड, अंधेरीतील हवा प्रदूषित

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईतील हवेचा स्तर सुधारला असला तरी माझगाव, मालाड, अंधेरी व चेंबूरमधील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. या परिसरामध्ये ‘वाईट’ हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली आहे.
संपूर्ण मुंबईत गेल्या आठवड्याभरापूर्वी वाढलेले प्रदूषण आता काहीअंशी कमी झाले आहे. मुंबई शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १८० एक्यूआय सह ‘मध्यम’ नोंदवला गेला. असे असले, तरी सर्वाधिक प्रदूषण माझगाव २८३, मालाड २४९, अंधेरी २११ आणि चेंबूर २०० एक्यूआयसह हवेचा स्तर ‘वाईट’ नोंदवला गेला. मुंबईतील सर्वांत कमी प्रदूषण बीकेसी ५१, वरळी ७७ एक्यूआय सह ‘समाधानकारक’ नोंद झाले, असून भांडुप ११२, कुलाबा व बोरिवली १३५ एक्यूआय सह ‘समाधानकारक’ नोंदवण्यात आला आहे. सध्या हवेची गती मंदावली आहे. त्यामुळे धूलिकण फारसे वाहून जात नसल्याने काही भागांतील हवेची गुणवत्ता खराब असल्याचे दिसून येते.