वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये एमटीडीसी सहभागी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये 
एमटीडीसी सहभागी होणार
वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये एमटीडीसी सहभागी होणार

वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये एमटीडीसी सहभागी होणार

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : जगभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी लंडनमध्ये ७ ते ९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीने या मार्टमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. साहसी, कृषी, जबाबदार, समृद्ध संस्कृती, वारसा आणि वन्यजीव पर्यटनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या लंडनमधील आघाडीच्या प्रवासी भागीदारांशी पर्यटन विभाग संवाद साधणार आहे.
महाराष्ट्रात कृषी, सांस्कृतिक आणि साहसी पर्यटनात प्रचंड क्षमता आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत राज्यातील ही माहिती पोहचण्यास मदत होणार आहे. पर्यटन विभाग सर्वसमावेशक पर्यटनाचा अवलंब करून, पर्यटन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कोरोनानंतर महाराष्ट्राने पर्यटनाच्या सर्व विभागांसाठी नियमावलीची जारी केली आहे. निवास युनिट्स, ट्रॅव्हल कंपन्या, वाहतूक, टूर गाइड, पर्यटक, मनोरंजन आणि वॉटर पार्क यांचा यामध्ये समावेश आहे. भारत सरकारच्या आतिथ्य उद्योगासाठी मूल्यमापन योजनेअंतर्गत चारशेहून अधिक हॉटेलनी नोंदणी केली आहे. याचाच अर्थ आता महाराष्ट्रात प्रवास करणे आणि राहणे पूर्णपणे सुरक्षित आहे, याची माहिती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत देता येईल, असे पर्यटन सचिव सौरभ विजय यांनी सांगितले.
......
महाराष्ट्रीयन परंपरा आणि संस्कृती
वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये राज्य पर्यटन संचालनालयातर्फे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ‘गेटवे ऑफ इंडिया’ची प्रतिकृती असलेला स्टॉल उभारण्यात येत आहे. महाराष्ट्रीयन परंपरा आणि संस्कृतीची दर्शन घडवणारी पंढरपूरची वारी, महाराष्ट्रीयन विवाह समारंभांचेही सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे. तसेच अजिंठा, एलोरा, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईतील आर्ट डेको इमारतींचे समूह आणि पश्चिम घाटातील चार नैसर्गिक स्थळे यांची माहिती दिली जाणार आहे.
.....