बीपीसीएलच्या अध्यक्षपदी वेत्सा रामा कृष्ण गुप्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीपीसीएलच्या अध्यक्षपदी वेत्सा रामा कृष्ण गुप्ता
बीपीसीएलच्या अध्यक्षपदी वेत्सा रामा कृष्ण गुप्ता

बीपीसीएलच्या अध्यक्षपदी वेत्सा रामा कृष्ण गुप्ता

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : वेत्सा रामा कृष्ण गुप्ता यांनी नुकतेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, तसेच व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. गुप्ता हे कंपनीत २४ वर्षे अर्थविषयक विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. नुकतेच बीपीसीएलच्या कोची तेलशुद्धीकरण प्रकल्पाला फिकी केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स अॅवॉर्ड २०२२ मिळाला आहे. देशात सर्वप्रथम प्रोपायलीन टेरीव्हेटीव प्रकल्पाद्वारे निर्मिती प्रक्रियेत साह्य केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय खते आणि रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते प्रकल्पाचे कार्यकारी संचालक अजित कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या प्रकल्पामुळे या रसायनांची आयात बंद होऊन चार हजार कोटी रुपये वाचतील.