एरॉस कंपनीविरोधात फौजदारी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एरॉस कंपनीविरोधात फौजदारी कारवाई
एरॉस कंपनीविरोधात फौजदारी कारवाई

एरॉस कंपनीविरोधात फौजदारी कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : सुमारे १८ कोटी रुपयांचा आयकर उशिराने जमा केल्याच्या आरोपात आयकर विभागाने एरॉस इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीविरोधात फौजदारी कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने कंपनीला समन्स बजावले आहेत. २०१६-१७ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे १८.२८ कोटी रुपयांचा कर भरणा कंपनीकडून व्हायला हवा होता; मात्र ही रक्कम सरकारी तिजोरीत नियमित वेळेत जमा करण्यात आली नाही. २०१६-१७ मध्ये १०.६१ कोटी रुपये; तर २०१७-१८ मध्ये ७.७७ कोटी रुपये कर जमा करायचा होता. दंडाधिकाऱ्यांपुढे विभागाने २०१९ ला याबाबत तक्रार केली होती. न्यायालयाने यावर कारवाई सुरू केली आहे.