आरेमध्ये गोठा कामगारावर प्राण्याचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरेमध्ये गोठा कामगारावर प्राण्याचा हल्ला
आरेमध्ये गोठा कामगारावर प्राण्याचा हल्ला

आरेमध्ये गोठा कामगारावर प्राण्याचा हल्ला

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : गोरेगावमधील आरे दुग्धवसाहतीमधील बिबट्याकडून बालकांवर हल्ल्याच्या दोन घटना ताज्या असतानाच आणखी एका व्यक्तीवर प्राण्याने हल्ला केल्याची घटना रविवारी (ता. ६) रात्री घडली. जियावन यादव (६०) असे हल्ल्यात किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते युनिट क्र. १५ मधील गोठ्यात काम करतात. अंधारात हल्ला झाल्याने हल्लेखोर प्राण्याविषयी संभ्रम आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार बिबट्याने हल्ला केल्याचा संशय आहे. यादव गोठ्यामध्ये काम करत असताना त्यांना फोन आला. रेंजच्या शोधात ते फोनवर बोलत गोठ्याबाहेर आले. या वेळी झुडपात बसलेल्या हिंस्र प्राण्याने यादव यांच्यावर हल्ला केला. प्राण्याने गुडघ्याखाली नखे मारून पळ काढला. हा बिबट्या असल्याची शंका यादव व स्थानिकांनी व्यक्त केली आहे. आरेमध्ये पुन्हा पिंजरे लावण्यात आले असून कॅमेऱ्यांद्वारे प्राण्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती वन परीक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांनी दिली.

.......