क्लब महिंद्र रिसॉर्टचा अनेक पुरस्कारांनी गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्लब महिंद्र रिसॉर्टचा अनेक पुरस्कारांनी गौरव
क्लब महिंद्र रिसॉर्टचा अनेक पुरस्कारांनी गौरव

क्लब महिंद्र रिसॉर्टचा अनेक पुरस्कारांनी गौरव

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील क्लब महिंद्र रिसॉर्टला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. कोरोना कालखंडानंतर क्लब महिंद्र रिसॉर्टचा नफा व उत्पन्नही वाढले आहे.

त्यांनी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ४,३९७ नवे सदस्य मिळवले व त्यांच्याकडून त्यांना १९४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. यात मोठ्या कंपन्यांनी सदस्यत्वासाठी केलेल्या २४ कोटी रुपयांचाही समावेश आहे. यामुळे आता त्यांची एकूण सदस्यसंख्या दोन लाख ७३ हजार झाली आहे.

गेल्या वर्षात त्यांनी ५०० नव्या खोल्यांची भर घातली; तर रिसॉर्टमधील खोल्या भरलेल्या राहण्याचे प्रमाण ७९ टक्के आहे. त्यांच्या ८६ रिसॉर्टमध्ये एकूण ४,७१५ खोल्या आहेत. या तिमाहीतील त्यांचे एकूण उत्पन्न ३२० कोटी रुपये झाले; तर फक्त रिसॉर्टमधून ६८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. त्यांचा करोत्तर नफा ४२ कोटी रुपये होता. त्यांना या वर्षी एशियाज बेस्ट कंपनीज टू वर्क तसेच आयजीबीसी ग्रीन चॅम्पियन अॅवॉर्ड २०२२; तर सिक्किम सरकारचा सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स व बेस्ट रिसॉर्ट पुरस्कारही मिळाला आहे.