शासकीय रोजगार मेळाव्यांच्या आर्थिक तरतूद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय रोजगार मेळाव्यांच्या आर्थिक तरतूद
शासकीय रोजगार मेळाव्यांच्या आर्थिक तरतूद

शासकीय रोजगार मेळाव्यांच्या आर्थिक तरतूद

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : राज्यातील खासगी उद्योगांमधील नोकरभरतीसाठी कौशल्य विकास विभागामार्फत आयोजित जिल्हा आणि विभागीय पातळीवरील रोजगार मेळाव्यांसाठी आता पाच लाख रुपयांपर्यंतची तरतूद करण्याचा निर्णय झाला आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भात काढलेल्या शासननिर्णयाची माहिती आज येथे दिली. आतापर्यंत विभागीय स्तरावरील रोजगार मेळाव्यासाठी एक लाख रुपये; तर जिल्हास्तरावरील रोजगार मेळाव्यासाठी ६० हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा होती, आता यात वरीलप्रमाणे वाढ झाली आहे. या मेळाव्याची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीवर एक लाख रुपये खर्च केले जातील. त्यामुळे रोजगार मेळावे जास्त चांगल्या प्रकारे आयोजित होतील, असेही ते म्हणाले.

बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी विविध उद्योगांकडून रिक्त पदांची तसेच अप्रेंटिशीप संबंधित रिक्त पदांची माहितीही घेतली जाते. या वेळी स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय व खासगी संस्थांना आमंत्रित केले जाते. उमेदवारांना माहिती देण्यासाठी स्टॉल्स लावले जातात. तसेच उमेदवारांना प्रशिक्षणाबाबत तसेच बायोडेटा तयार करण्याबाबत माहिती देणे, भविष्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधी, मुलाखतीची तयारी इत्यादीबाबत मार्गदर्शनासाठी रोजगार मेळाव्यांचे योग्य प्रकारे आयोजन करणे आवश्यक आहे. यासाठी खर्च मर्यादेत वाढ करण्यात आली आहे, अशी माहितीही लोढा यांनी दिली.