डी गँगला हवालामार्फत पैशांचा पुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी गँगला हवालामार्फत पैशांचा पुरवठा
डी गँगला हवालामार्फत पैशांचा पुरवठा

डी गँगला हवालामार्फत पैशांचा पुरवठा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : भारतात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी कारवायांसाठी अटक आरोपींना हवालामार्फत मोठी रक्कम पाठवल्याचा आरोप एनआयएने आरोपपत्रात केला आहे. याशिवाय राजकीय आणि अन्य प्रतिष्ठित व्यक्तींना टार्गेट करण्यासाठी विशेष सेल स्थापन केला आहे, असा दावाही आरोपपत्रात केला आहे.

एनआयएने नुकताच दाऊद, छोटा शकीलसह अटकेतील तीन आरोपींवर विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यामध्ये आरीफ भाईजान, शब्बीर शेख आणि मोहमम्द सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट यांना अटक केली होती. तिघेही दाऊदचे निकटचे साथीदार आहेत. त्यांच्या चौकशीमध्ये दाऊद आणि शकीलचे नाव उघड झाले. मुंबईसह देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी, राजकीय व्यक्ती आणि काही विशिष्ट व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी वेगळा गट सुरू केला आहे. या गटाला परदेशातील फरार आरोपींकडून हवालामार्फत प्रचंड पैसा पुरवण्यात येतो, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

तसेच २०११ मध्ये आणि त्यानंतरही आरोपी कुरेशीने मुंबईतील सुमारे २.७० कोटी किमतीच्या दोन सदनिका पीडितांना धमकावून हडप केल्या, असे तपासात उघड झाले आहे. तसेच अन्य एका प्रकरणात कुरेशीने नागरिकांना धमकावून ५३.७५ लाख रुपये उकळल्याचेही समोर आले असून, अन्य काही प्रकरणांतही आरोपी दाऊद आणि शकीलच्या नावाने धमक्या दिल्या असा आरोप केला आहे.