विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहासाठी अल्टिमेटम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहासाठी अल्टिमेटम
विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहासाठी अल्टिमेटम

विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहासाठी अल्टिमेटम

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाच्या उद्‍घाटनाचा कार्यक्रम पार पडून महिने उलटले तरी वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. विद्यापीठ प्रशासनाने येत्या २४ तासांत निर्णय घ्यावा; अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज दिला आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ११ नोव्हेंबरच्या विद्यापीठातील दौऱ्यावेळी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठात मुलींसाठी नवीन वसतिगृह बांधण्यात आले असून, त्याचे उद्‍घाटन ८ जुलैला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. या सोहळ्याला चार महिने उलटून गेले तरीही हे वसतिगृह उपलब्ध झाले नाही. याच पार्श्वभूमीवर अभाविपने आज विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव शैलेंद्र देवळाणकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. अभाविप कोकण प्रदेश मंत्री अमित ढोमसे यांनी सांगितले, की मुंबई विद्यापीठाने येत्या २४ तासांत वसतिगृहातील प्रवेश प्रकिया सुरू न केल्यास आम्हाला आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला जागे करावे लागेल.