फेरीवाल्यांच्या स्वनिधी वाटपाचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेरीवाल्यांच्या स्वनिधी वाटपाचे आव्हान
फेरीवाल्यांच्या स्वनिधी वाटपाचे आव्हान

फेरीवाल्यांच्या स्वनिधी वाटपाचे आव्हान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज मिळवून देण्यात येत आहे. मुंबई महापालिकेत गेल्या दोन वर्षांत कर्जासाठी आलेल्या अर्जांपैकी २४ हजार ९४२ फेरीवाल्यांचे अर्ज मंजूर केले आहेत; मात्र त्यातील केवळ ८,०७० जणांना निधी दिला गेला आहे. यावरून विविध स्तरांतून टीका सुरू झाल्यानंतर पालिकेने महिनाभरात एक लाख फेरीवाल्यांना निधीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र जे दोन वर्षांत झाले नाही ते महिनाभरात कसे होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

योजनेंतर्गत १६,१५९ विनापरवाना फेरीवाल्यांनी कर्जासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ११ हजार ९८८ जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्यापैकी केवळ ८,०७० जणांना निधी मिळाला आहे. यानंतर योजनेची गती मंदावली. यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने आपल्या कामाची गती वाढवली आहे. उर्वरित ९० हजार फेरीवाल्यांना महिन्याभरात निधीचे वाटप केले जाणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. फेरीवाल्यांना अर्ज करण्यासाठी सायबर कॅफेमध्ये जावे लागते. या त्रासातून मुक्त होण्यासाठी पालिकेने आता ‘बॅकअप सपोर्ट’ देण्याचे ठरवले आहे. पालिका एनजीओमार्फत फेरीवाल्यांच्या ठिकाणी लॅपटॉपद्वारेच अर्ज स्वीकारणार आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

...अशी आहे योजना
१) योजनेंतर्गत पहिल्यांदाच फेरीवाल्यांना १० हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. ते फेरीवाले एका वर्षात १० सुलभ हप्त्यांमध्ये परत करू शकतात. वेळेवर कर्ज फेडणाऱ्या फेरीवाल्यांना दुसऱ्यांदा २० हजार रुपयांचे कर्ज मिळते. दुसऱ्यांदा हप्ते भरणारे तिसऱ्यांदा ५० हजार रुपयांचे कर्ज घेऊ शकतात.
२) जे फेरीवाले कर्ज फेडणार नाहीत त्यांना डिफॉल्टच्या श्रेणीत टाकले जाईल. यामुळे त्यांना पुन्हा कर्जाची गरज भासल्यास कर्ज घेऊ शकणार नाहीत. फेरीवाल्यांना कर्ज मिळवून देण्याची ही योजना २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. पालिका प्रधानमंत्री स्वानिधी योजनेबाबत फेरीवाल्यांमध्ये जनजागृती करत आहे.


......