फॅशन स्ट्रीटच्या दुकानदारांना दोन लाखाची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फॅशन स्ट्रीटच्या दुकानदारांना दोन लाखाची मदत
फॅशन स्ट्रीटच्या दुकानदारांना दोन लाखाची मदत

फॅशन स्ट्रीटच्या दुकानदारांना दोन लाखाची मदत

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीटला ५ नोव्हेंबरला लागलेल्या भीषण आगीत २३ दुकाने जळून मोठे नुकसान झाले होते. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज या नुकसानग्रस्त दुकानांची पाहणी केली. यादरम्यान बोलताना त्यांनी नुकसान झालेल्या दुकानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या दुकानदारांना दिलासा मिळणार आहे.