बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया बेकायदेशीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाची
प्रक्रिया बेकायदेशीर
बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया बेकायदेशीर

बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया बेकायदेशीर

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारने सुरू केलेली भूसंपादनाची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा गोदरेज समूहाने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.
गोदरेज अँड बॉईस कंपनीने गुरुवारी न्यायालयात केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत अडसर आणून प्रकल्पास कंपनी उशीर करत असल्याच्या राज्य सरकारच्या आरोपांचे खंडन केले. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याच्या राज्याच्या आदेशाला कंपनीने न्यायालयात याचिका दाखल करून विरोध केला आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेस उशीर होण्यास गोदरेज कंपनीच जबाबदार असल्याचा दावा राज्य सरकारने केला. कंपनीच्या वतीने गुरुवारी न्या. नितीन जामदार आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. त्याची नोंद घेत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २१ नोव्हेंबरला निश्चित केली.
---
प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी
बुलेट ट्रेनसाठीच्या जागेकरिता राज्य सरकारने २६४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई निश्चित केली; मात्र ही रक्कम कंपनीने अमान्य केली आहे. विक्रोळीतील १० हेक्टरचा प्लॉट बुलेट ट्रेनसाठी ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली; मात्र कंपनीने याविरोधात न्यायालयात या प्रक्रियेलाच स्थगिती देण्याची मागणी करत याचिका दाखल केली आहे.