डॉ. सहस्त्रबुद्धे, प्रभुणे, कांबळे राज्य सांस्कृतिक धोरण समितीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. सहस्त्रबुद्धे, प्रभुणे, कांबळे
राज्य सांस्कृतिक धोरण समितीवर
डॉ. सहस्त्रबुद्धे, प्रभुणे, कांबळे राज्य सांस्कृतिक धोरण समितीवर

डॉ. सहस्त्रबुद्धे, प्रभुणे, कांबळे राज्य सांस्कृतिक धोरण समितीवर

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०१० मध्ये महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण निश्चित करण्यात आले. या धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी एक समिती नुकतीच गठित करण्यात आली. या समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली असून गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, सुहास बहुळकर यांचा समितीत समावेश असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या समितीत सांस्कृतिक कार्यमंत्री हे अध्यक्ष असतील.
समितीत सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, उपसचिव, पर्यटन विभागाचे उपसचिव, पर्यटन संचालनालयाचे व्यवस्थापकीय संचालक, क्रीडा संचालनालयाचे आयुक्त, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव, भाषा संचालनालयाचे संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक, कला संचालनालयाचे संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक हे शासकीय सदस्य असतील. याशिवाय गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, सुहास बहुलकर, कौशल इनामदार, बाबा नंदनपवार, जगन्नाथ हिलीम, सोनू म्हस हे या समितीत अशासकीय सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.