परळ टिटी पुलावरील जोड कमी करणार : | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परळ टिटी पुलावरील जोड कमी करणार :
परळ टिटी पुलावरील जोड कमी करणार :

परळ टिटी पुलावरील जोड कमी करणार :

sakal_logo
By

परळ-टीटी पुलावरील
जोड कमी करणार
मुंबई : मुंबई महापालिकेने परळ-टीटी पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. पुलाचे ३२ जोड नादुरुस्त अवस्थेत असल्याने त्यावर तांत्रिक कारणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पालिका पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेणार आहे. पुलाच्या पिलरच्या जॉईंट्सची संख्या कमी करण्यात येणार आहे. त्यासाठी पूल वाहतुकीस बंद करावा लागणार असल्याने दक्षिण मुंबईलाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी परळ-टीटी उड्डाणपुलाचा सर्वाधिक वापर केला जातो. पुलाची सध्या दुरवस्था झाल्याने त्याची डागडुजी करण्यात येणार आहे. सध्या पुलावर ३२ जोड आहेत. त्यामधील अंतर वाढले आहे. त्यामुळे वाहन एकमेकांना आदळण्याचे प्रमाण वाढले आहे. पुनर्बांधणीच्या वेळी पूल जोडणाऱ्या पॉईंट्सची संख्या चारपर्यंत कमी करण्याचेचे उद्दिष्ट आहे. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पालिकेने वाहतूक विभागाकडे परवानगी मागितली आहे. मात्र, वाहतूक विभागाने अद्याप ती दिलेली नाही. पालिकेने पुलावर दुचाकीचा वापर करू नये, असे फलक लावले आहेत.

.......