स्मशानभूमीची पुर्नबांधणीबाबात उच्च न्यायालयाची नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मशानभूमीची पुर्नबांधणीबाबात उच्च न्यायालयाची नाराजी
स्मशानभूमीची पुर्नबांधणीबाबात उच्च न्यायालयाची नाराजी

स्मशानभूमीची पुर्नबांधणीबाबात उच्च न्यायालयाची नाराजी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मालाडमधील एरांगळ सागरी किनारा परिसरात असलेल्या हिंदू स्मशानभूमीची पुनर्बांधणी करण्याबाबतच्या आदेशांची पूर्तता अद्याप मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कोळी बांधवांसाठी असलेल्या या स्मशानभूमीचे बेकायदा पाडकाम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रीतसर प्रक्रिया न राबवता करण्यात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने ते पुन्हा बांधण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना सप्टेंबरमध्ये दिले होते. आज याबाबत मुंबई महापालिकेकडून अहवाल दाखल करण्यात आला. या बांधकामाला सुमारे २९,६४,००० खर्च अपेक्षित आहे. तसेच संबंधित शासकीय परवानगी घेणे आवश्यक आहे, त्याची पूर्तता करण्यात विलंब होत आहे, असे सांगण्यात आले. याबाबत मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी दुपारी पुन्हा यावर सुनावणी होणार असून त्यापूर्वी निर्देशांचे पालन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.