कमी बोलीत निविदा बळकावण्याचे षड्‍यंत्र! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमी बोलीत निविदा बळकावण्याचे षड्‍यंत्र!
कमी बोलीत निविदा बळकावण्याचे षड्‍यंत्र!

कमी बोलीत निविदा बळकावण्याचे षड्‍यंत्र!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १२ : मुंबई महापालिकेच्या पी उत्तर विभागातील सुशोभीकरण कामाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला आहे. निविदेमध्ये अंदाजे किमतीपेक्षा कमी बोली लावून निविदा पदरात पाडून घेतली जाते. नंतर अधिकाऱ्यांशी संगनमत करून किंमत वाढवून घेतली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे तक्रार करून त्यांनी चौकशीची मागणीही केली आहे.

कोविड काळात पालिकेने केलेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या कामाची चौकशी राज्य सरकारच्या मान्यतेने कॅग करत आहे. अशाच प्रकारे पालिकेच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप मिश्रा यांनी तक्रारीमध्ये केला आहे. यामध्ये पालिका अधिकाऱ्यांची मिलीभगत असून याविरोधात आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि सहआयुक्त (दक्षता) अजित कुंभार यांच्याकडे मिश्रा यांनी तक्रार केली आहे. अंदाजे खर्चापेक्षा फारच कमी किंवा अधिक बोली लावलेल्या निविदांची दक्षता विभागामार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, कंपन्यांना पालिकेच्या कोणत्याही निविदांमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.