पेटीएमच्या व्यवसायात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेटीएमच्या व्यवसायात वाढ
पेटीएमच्या व्यवसायात वाढ

पेटीएमच्या व्यवसायात वाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : मोबाईल पेमेंट क्षेत्रातील आघाडीची कंपनी पेटीएमच्या व्यवसायात ऑक्टोबर महिन्यातही भरीव वाढ झाली असून त्यांनी ३४ लाख कर्जे दिली. यामध्ये वार्षिक वाढ १६१ टक्के आहे. कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी भागधारकांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. पेटीएमच्या शेअरची नोंदणी शेअरबाजारात झाल्यास आता वर्ष पूर्ण होणार आहे. त्या मुहूर्तावर आता व्याज, कर, घसारा आदी वगळून (ईबीआयटीडीए) होणाऱ्या कंपनीच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली असून नफ्यातील वित्तसंस्था होण्याकडे आपला प्रवास सुरू आहे, असेही ते म्हणाले.
दुकाने, छोटे व्यावसायिक यांच्याकडे आतापर्यंत व्यवहारासाठी ५१ लाख उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यांच्या कर्ज व्यवसायाची वार्षिक उलाढाल ३७ हजार कोटी रुपये झाली आहे. ऑक्टोबरमधील दिलेल्या कर्जांचे मूल्य ३ हजार ५६ कोटी रुपये असून त्यातील वार्षिक वाढ ३८७ टक्के आहे. पेटीएममार्फत होणाऱ्या व्यवहारांचे एकूण मूल्य १.१८ लाख कोटी रुपये झाले; तर ऑक्टोबर महिन्यात पेटीएम वापरकर्त्यांनी ८.४० कोटी व्यवहार केले, यातील वार्षिक वाढही ३३ टक्के आहे.