Corona Update : गुड न्यू! राज्यातील कोरोना नियंत्रणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona
राज्यातील कोरोना नियंत्रणात

Corona Update : गुड न्यू! राज्यातील कोरोना नियंत्रणात

मुंबई : राज्यातील कोविड रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. मागील दोन आठवड्यात कोविड रुग्णसंख्येत जवळपास ३७.४९ टक्के घट झाली. ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२२ आणि ७ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या दोन आठवड्यांत आढावा घेतला असता सप्ताहातील दैनंदिन कोविड रुग्णसंख्या १,६५९ वरून १,०३७ पर्यंत कमी झाली आहे. सध्या चालू आठवड्यांमध्ये कोविड चाचण्यांची पॉझिटिव्हिटी १.५७ टक्क्यांवरून १.१५ टक्क्यांवर आली आहे. अकोला, वाशिम, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांपेक्षा अधिक आहे. रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या तसेच आयसीयूमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांमध्ये नियमितपणे घट होत आहे.

पुण्यात बी.क्यू.१.१ नवा व्हेरिएंट
पुणे शहरात २९ वर्षाच्या पुरुषामध्ये ओमिक्रॉन प्रकारातील बी.क्यू.१.१ हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा रुग्ण आयर्लंडवरून आला असून त्याला सौम्य स्वरूपाचा आजार होता. तो घरगुती विलगीकरणात बरा झाला. या प्रवाशाने कोविशिल्ड लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. राज्यात आतापर्यंत मुंबई (७२), पुणे (२९) ठाणे (८), नागपूर, भंडारा येथे प्रत्येकी दोन, अकोला, अमरावती, रायगडमध्ये प्रत्येकी १ असे एकूण ११६ एक्सबीबी व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत.