बालभवनसाठी दहा कोटींचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालभवनसाठी दहा कोटींचा निधी
बालभवनसाठी दहा कोटींचा निधी

बालभवनसाठी दहा कोटींचा निधी

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : सध्या मुंबईत होत असलेल्या ‘बालभवन’च्या उपक्रमांची व्याप्ती येत्या वर्षापासून राज्यभरात वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केली.
मंत्री केसरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मुंबईच्या वतीने आयोजित विविध सहशालेय स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, बालभवनचे संचालक आर. एस. नाईकवाडी, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बाल दिन म्हणून साजरा केला जातो. यामुळेच मुंबईतील बालभवनला त्यांचे नाव दिले गेले. यापुढे बालभवनचे उपक्रम राज्यात सर्वत्र राबविण्यात येतील. मुंबईतील बालभवन इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने विविध उपक्रमांसाठी संस्थेला जोगेश्वरी येथील शिक्षण विभागाची जागा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.