दादरच्या फूलविक्रेत्यांवर तूर्तास कारवाई नको! तूर्तास कारवाई नको! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादरच्या फूलविक्रेत्यांवर तूर्तास कारवाई नको!
तूर्तास कारवाई नको!
दादरच्या फूलविक्रेत्यांवर तूर्तास कारवाई नको! तूर्तास कारवाई नको!

दादरच्या फूलविक्रेत्यांवर तूर्तास कारवाई नको! तूर्तास कारवाई नको!

sakal_logo
By

मुंबई : दादर पश्चिमेकडील उपेंद्रनगरमधील फूल व्यापाऱ्यांच्या दुकानांवर तूर्तास कारवाई करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज मुंबई महापालिकेला दिले. दुकानदारांनीही पालिकेच्या परवानगीशिवाय संबंधित जागेवर अधिक बांधकाम करू नये, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. दादरमधील ३० पैकी चार दुकानदारांनी उच्च न्यायालयात पालिकेच्या कारवाईविरोधात याचिका दाखल केली आहे. उपेंद्रनगर सोसायटीच्या वतीने आलेल्या तक्रारींवर कारवाई केली, असा खुलासा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. अनधिकृत दुकानांवर कारवाई केली, असे पालिकेचे म्हणणे आहे. पालिकेने कोणतीही नोटीस न देता कारवाई केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. दुकानदार व्यावसायिक जागा असलेल्या ठिकाणी काम करतात आणि फुले व इतर वस्तू विकतात. उत्पन्न कमावण्याचे तेच त्यांचे साधन आहे, असा व्यापाऱ्यांचा दावा आहे. न्या. आर. डी. धनुका आणि न्या. कमल खता यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठाने महापालिकेला तिथे वाहन उभे न करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित जागेवर अतिक्रमण न करण्याचे निर्देश दुकानदारांना दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी ५ डिसेंबर रोजी होणार आहे.