वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींमधील गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींमधील गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती
वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींमधील गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती

वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींमधील गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती

sakal_logo
By

वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन
इमारतींमधील सदनिकांची निश्चिती
मुंबई, ता. १५ : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र गाळेधारकांना वितरित करावयाच्या ३०४ पुनर्वसन सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती सोमवारी (ता. १४) पार पडली; पात्र गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या व मालकी तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचा आणि इमारतीचा क्रमांक व मजला निश्चित करण्यात आला.

म्हाडा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वरळीमधील इमारत क्रमांक ३२, ३३, ३९ आणि ४० मध्ये वास्तव्यास असलेल्या पात्र भाडेकरू आणि रहिवाशांना पुनर्वसन इमारतींमध्ये मालकी तत्त्वावर मिळणाऱ्या सदनिकांचा क्रमांक संगणकीय प्रणालीद्वारे निश्चित करण्यात आला. चार इमारतींमध्ये एकूण ३२० गाळे व सदनिका आहेत. १२ गाळे पालिकेच्या शाळेला देण्यात आले आहेत. चार अनिवासी गाळे आहेत. सदनिका निश्चित करण्यात आलेले भाडेकरू आणि रहिवाशांची यादी म्हाडाच्या  https://mhada.gov.in  वर प्रसिद्ध केली जाणार आहे.

उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य जॉनी जोसेफ, राज्य सूचना व विज्ञान अधिकारी मोईज हुसैन अली, मुंबई विकास विभागाचे संचालक सतीश आंबावडे, कार्यकारी अभियंता प्रशांत धात्रक, उपमुख्य अधिकारी (बीडीडी प्रकल्प) राजेंद्र गायकवाड आदी सदनिका निश्चितीवेळी उपस्थित होते. सावली इमारतीतील १८ गाळेधारकांची प्रस्तावित पुनर्वसन इमारतीमधील सदनिकांची निश्चिती काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प देशातील सर्वांत मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प असून त्याची जबाबदारी सरकारने म्हाडाकडे सोपवली आहे.