सौरभ त्रिपाठींना अटकपूर्व जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सौरभ त्रिपाठींना अटकपूर्व जामीन
सौरभ त्रिपाठींना अटकपूर्व जामीन

सौरभ त्रिपाठींना अटकपूर्व जामीन

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : अंगाडिया खंडणी प्रकरणातील आरोपी आणि फरारी म्हणून घोषित करण्यात आलेले निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना मंगळवारी (ता. १५) मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
त्रिपाठी हे तपासात सहकार्य करत आहेत आणि त्यांनी त्यांचा मोबाईल आणि सिमकार्ड पोलिसांना सुपूर्द केले आहे. तसेच या प्रकरणातील अन्य आरोपींविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे, असे न्यायालयात सरकारी वकिलांकडून सांगण्यात आले. त्याची नोंद करून न्या. भारती डांग्रे यांनी सशर्त जामीन मंजूर केला. सुट्टीकालीन न्यायालयाने त्रिपाठी यांना मंगळवारपर्यत संरक्षण दिले होते. आज सुनावणीनंतर न्यायालयाने ते कायम ठेवले.
दक्षिण मुंबईतील एलटी मार्ग पोलिसांनी १९ फेब्रुवारीला त्रिपाठीसह चार पोलिसांविरोधात खंडणी प्रकरणात एफआयआर नोंदवला होता. एक निरीक्षक, एलटी मार्ग पोलिस ठाण्याशी संलग्न सहायक निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकाला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सर्व जण आता जामिनावर आहेत.
मी कोणत्याही गैरप्रकारांमध्ये सामील नाही. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्धच्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करण्यास मी नकार दिल्यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी सूडबुद्धीने या प्रकरणात मला गोवले आहे. मला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी तपास यंत्रणा अंगडिया ऑपरेटर आणि त्यांच्या एजंटच्या विधानांवर अवलंबून आहे, असा दावा त्रिपाठी यांनी याचिकेतून केला आहे.
...