‘इंद्रधनुष्य’वर पुन्हा मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इंद्रधनुष्य’वर पुन्हा मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर
‘इंद्रधनुष्य’वर पुन्हा मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर

‘इंद्रधनुष्य’वर पुन्हा मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : १८ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ मध्ये मुंबई विद्यापीठाने बाजी मारत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले. ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर उमटली. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत मुंबई विद्यापीठाने स्पर्धेच्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १७ वेळा हा चषक आपल्याकडे राखण्याचा बहुमान मिळवला आहे.
वाङ्मय, ललितकला, संगीत, नाट्य आणि नृत्य या स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने ११९ गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद मिळवून अव्वल स्थान पटकावले. द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यापीठास ८७ गुण मिळाले आहेत. या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये राज्यातील २१ विद्यापीठे सहभागी झाली होती.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी भारतीय शास्त्रीय तालवाद्य, भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय लोकनृत्य, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, माती शिल्पकाम, चित्रकला, पोस्टर, रांगोळी या विभागामध्ये सुवर्णपदक मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. यासोबत विविध स्तरांवरील सर्वसाधारण चषकांमध्ये पाश्चिमात्य एकल वाद्यवादन, भारतीय समूह गीत, लोक वाद्यवृंद, नकला, इन्स्टॉलेशन या स्पर्धांमध्ये रौप्यपदक प्राप्त केले आहे. पाश्चिमात्य एकलगायन, भारतीय सुगम संगीत गायन, मूकनाट्य, वाद-विवाद स्पर्धांमध्ये कास्यपदक प्राप्त केले आहे. पाच विभागांपैकी नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललितकला विभागात सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले आहे.
...
रिया मोरेला सुवर्णकन्या किताब
कुमारी रिया मोरे या विद्यार्थिनीने विविध पाच स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन सर्वांत जास्त बक्षीस मिळवून सुवर्णकन्या (गोल्डन गर्ल) किताब मिळवला. विद्यापीठाच्या ४२ विद्यार्थ्यांच्या संघांनी या सर्व कलाप्रकारांत सहभाग घेतला होता.