प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक
प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक

प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : दहिसर (पूर्व) पश्चिम द्रुतगती मार्गावर बेस्टच्या बसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री दहिसर चेकपोस्टकडे जाणाऱ्या बेस्टच्या बसची कारला धडक बसली. त्यानंतर काही तरुणांनी बसवर दगडफेक केली. याप्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघांना अटकदेखील करण्यात आली आहे. तसेच उर्वरित सहा आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सोमवारी (ता. १४) रोजी दहिसर चेक नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या बेस्ट बसचा एका कारला बसचा धक्का लागला. त्यानंतर त्या कारमधील तरुणांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांना बोलावून बसचालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या वेळी सहा ते सात तरुणांनी बसवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पोलिसांकडून समीर दत्तात्रेय सुर्वे (वय ४५ ) आणि संजीव गौरी दर्शन सिंग (वय ४५) या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून १७ नोव्हेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली तसेच अन्य आरोपींचा शोध सुरू आहे, असे दहिसर पोलिसांकडून सांगण्यात आले. मारहाण झालेल्या बसचालकाचे नाव रमेश पवार आहे.