हर घर सुरक्षित मोहीमेत घरांच्या सुरक्षेची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर घर सुरक्षित मोहीमेत घरांच्या सुरक्षेची तपासणी
हर घर सुरक्षित मोहीमेत घरांच्या सुरक्षेची तपासणी

हर घर सुरक्षित मोहीमेत घरांच्या सुरक्षेची तपासणी

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ ः हर घर सुरक्षित या मोहिमेत देशात सर्वात जास्त चोरी होणाऱ्या दहा शहरांमधील वस्त्यांमध्ये गोदरेज लॉक्सतर्फे सुरक्षाविषयक विशेष मोहीम वर्षभर हाती घेतली जाणार आहे. या वेळी घरांच्या सुरक्षेची तपासणी केली जाईल.

या मोहिमेत अशा वस्त्यांमध्ये गोदरेजतर्फे विशेष बूथ भरवले जातील. तेथे हजर असलेल्या तज्ज्ञांतर्फे घरांच्या वसाहतींच्या व अंतर्गत सुरक्षिततेबाबत तपासणी करून दिली जाईल. तसेच घरफोडी, दरोडे प्रतिबंधक सुरक्षाविषयक टिप्सदेखील दिल्या जातील, घरात कोणी नसताना घर सुरक्षित कसे ठेवावे, याची माहिती दिली जाईल, असे गोदरेज लॉक्सचे बिझनेस हेड श्याम मोटवानी यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात लोकांचे उत्पन्न कमी झाल्यामुळे सन २०२० पासून देशात चोरी-दरोड्याच्या प्रमाणात १७ टक्के वाढ झाली आहे, असा नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल सांगतो. त्यामुळे घरे सुरक्षित ठेवण्यासाठी गोदरेजतर्फे वर्षभर म्हणजे ५२ आठवडे ही मोहीम चालवण्यात येईल. दिल्ली, मुंबई, भुवनेश्वर, जयपूर, लखनौ, बंगलोर, चंडीगड, भोपाळ, अहमदाबाद व पाटणा या दहा शहरांमधील घरांची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे काम गोदरेज करेल. घरांच्या सुरक्षिततेत काय त्रुटी आहेत, याची माहितीही या वेळी दिली जाईल, असेही मोटवानी यांनी सांगितले.