बांधकामात तंत्रज्ञान विकास क्षेत्रात एचडीएफसी निधी गुंतवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकामात तंत्रज्ञान विकास क्षेत्रात एचडीएफसी निधी गुंतवणार
बांधकामात तंत्रज्ञान विकास क्षेत्रात एचडीएफसी निधी गुंतवणार

बांधकामात तंत्रज्ञान विकास क्षेत्रात एचडीएफसी निधी गुंतवणार

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ ः बांधकाम क्षेत्रात डिजिटल तसेच अन्य आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपन्यांना अर्थसाह्य देण्यासाठी एचडीएफसीने पाचशे कोटींचा निधी जमवला असून, हे तंत्रज्ञान वापरणाऱ्या किंवा अशा तंत्रज्ञानाची निर्मिती करणाऱ्या स्टार्टअपमध्ये त्यातून गुंतवणूक केली जाईल.

यासाठी एचडीएफसी कॅपिटलतर्फे एचडीएफसी हार्ट (हाऊसिंग ॲण्ड अफोर्डेबल रिअल इस्टेट ॲण्ड टेक्नॉलॉजी) ची स्थापना करण्यात आली आहे. एचडीएफसीतर्फे आयोजित रियल इस्टेट टेक इनोव्हेटर चॅलेंज २०२२ मध्ये या निधीसाठी ५३७ स्टार्टअपने अर्ज केले. त्यातील दहा ते पंधरा उत्तम स्टार्टअपची छाननी करण्यात आली. यापैकी काही स्टार्टअपना एचडीएफसीने निधी दिला आहे. बांधकाम व्यवसायात सर्वांत कमी डिजिटायझेशन झाले असून त्यांचा जेमतेम दीड टक्के महसूल डिजिटल तंत्रज्ञानावर खर्च होतो. तोही त्यांच्या मुख्यालयावरच खर्च होतो, प्रत्यक्ष साइटवरील कामासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीवर फार कमी खर्च होतो. बांधकाम व्यवसायात प्रत्येक टप्प्यावर खर्च कमी व्हावा आणि कार्यक्षमता वाढावी हा एचडीएफसी हार्टचा प्रयत्न आहे. त्यासाठी एचडीएफसी हार्टने जगातून पाचशे कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टेक्नॉलॉजी फंड गोळा केला आहे.

कार्यक्षम रिअल इस्टेट यंत्रणेसाठी तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यानेच सर्वांसाठी घर हे देशाचे उद्दिष्ट साध्य होईल.
- दीपक पारेख, अध्यक्ष, एचडीएफसी.

परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळणे व नवकल्पनांना अर्थसाह्य करणे यासाठी हार्ट हे उत्तम व्यासपीठ आहे.
- विपुल रुंगटा, एम. डी. व सी. ई. ओ. एचडीएफसी कॅपिटल ॲडव्हायझर