मालेगाव प्रकरणी एटीएस अधिकाऱ्यांविरोधात जामीनपात्र वॉरंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालेगाव प्रकरणी एटीएस 
अधिकाऱ्यांविरोधात जामीनपात्र वॉरंट
मालेगाव प्रकरणी एटीएस अधिकाऱ्यांविरोधात जामीनपात्र वॉरंट

मालेगाव प्रकरणी एटीएस अधिकाऱ्यांविरोधात जामीनपात्र वॉरंट

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात साक्ष देण्यासाठी सतत गैरहजर राहणाऱ्या एटीएस अधिकाऱ्यांविरोधात विशेष न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास पूर्वी एटीएस करत होता. त्या वेळी त्यांनी काही साक्षीदारांची जबानी नोंदवलेली आहे; मात्र आता खटल्यात अनेक साक्षीदार फितूर झाले आहे. त्यापैकी काहींचा जबाब ज्या अधिकाऱ्यांनी नोंदवला, त्यांना विशेष न्यायालयाने यापूर्वी साक्ष देण्यासाठी रीतसर बोलविले होते; मात्र अद्याप त्यांनी न्यायालयात हजेरी लावली नाही. संबंधित अधिकार्यांची प्रकृती ठीक नाही, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर विशेष न्या. ए. के. लाहोटी यांनी अधिकाऱ्यांविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले.