सेन्सेक्स ६२,००० | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेन्सेक्स ६२,०००
सेन्सेक्स ६२,०००

सेन्सेक्स ६२,०००

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ ः देशांतर्गत अनुकूल आर्थिक वातावरणाच्या जोरावर आज शेअर बाजारात वाढ झाली. सेन्सेक्स ६२ हजारांना स्पर्श करून किंचित माघारी आला. आज निफ्टी ६.२५ अंश; तर सेन्सेक्स १०७.७३ अंश वाढला.

जागतिक शेअर बाजार संथ असल्यामुळे आज भारतीय शेअरबाजार निर्देशांकांची सुरुवातही शांत झाली. मात्र नंतर त्यात वाढ होत गेली आणि सेन्सेक्सने आज ६२ हजारांच्या टप्प्याला स्पर्श केला होता; पण तेथून तो पुन्हा माघारी आला. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ६१ हजार ९८०.७२ अंशावर; तर निफ्टी १८,४०९.६५ अंशांवर स्थिरावला.

आज निफ्टीच्या प्रमुख पन्नासपैकी २१ शेअरचे भाव वाढले; तर सेन्सेक्सच्या मुख्य ३० पैकी १७ चे भाव वाढले. आज कोटक बँक पावणेतीन टक्के वाढला; तर डॉक्टर रेड्डीज लॅब, हिंदुस्तान युनिलिव्हर, सनफार्मा, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, एअरटेल, टीसीएस, इन्फोसिस या शेअरचे भाव अर्धा ते एक टक्का वाढले; तर बजाज फायनान्स, टाटा स्टील, बजाज फिन्सर्व या शेअरचे भाव एक ते दोन टक्का कमी झाले. अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्र आणि महिंद्र, ॲक्सिस बँक या शेअरचे भाव अर्धा ते एक टक्का पडले.

रुपया ३४ पैसे घसरला
...........................
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज रुपयाचा भाव ३४ पैशांनी घसरून तो ८१.२५ वर बंद झाला. आज व्यवहारांना सुरुवात होताना रुपया ८१.४१ वर उघडला होता. तेथून तो ८१.५८ पर्यंत घसरला; तर ८१.२३ पर्यंत सुधारला. मात्र नंतर तो ८१.२५ वर बंद झाला. आज आशियातील जवळपास सर्वच चलनांचे भाव घसरल्यामुळे रुपयादेखील घसरला, असे सांगण्यात आले.