मुंबईत थंडीची चाहूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत थंडीची चाहूल
मुंबईत थंडीची चाहूल

मुंबईत थंडीची चाहूल

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : नोव्हेंबरमध्ये थंडीचा जोर वाढत असला, तरी यंदा मुंबईत म्हणावा तसा गारवा नाही. असे असले, तरी रात्रीच्या किमान तापमानात काहीशी घट झाल्याने रात्री थंडीची चाहूल जाणवू लागली आहे.

मंगळवारी रात्री सांताक्रूझमध्ये २१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कुलाब्यात २३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. दोन दिवसांपूर्वी किमान तापमान २६-२७ अंशांवर होते. किमान तापमानात ५ ते ६ अंशांची घट झाली आहे. त्यामुळे रात्री गारवा जाणवत असल्याने नागरिकांना थंडीचा अनुभव घेता येत आहे.

मुंबईतील कमाल तापमान मात्र अजून चढेच आहे. संताक्रूझमध्ये ३५.१ आणि कुलाब्यात ३३.४ कमाल तापमानाची नोंद झाली. रात्री गारवा जाणवत असला, तरी दिवसा मात्र उकडत आहे. कमाल तापमानात अद्याप घट झालेली दिसत नाही. त्यामुळे रात्री थंडी आणि दिवसा घामाच्या धारा, असे चित्र सध्या मुंबईत आहे.