Sat, March 25, 2023

वरळीत रसायन गळतीमुळे चौघे जखमी
वरळीत रसायन गळतीमुळे चौघे जखमी
Published on : 16 November 2022, 4:13 am
मुंबई, ता. १६ : वरळी येथील सस्मिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि टेक्स्टाईल येथे रसायन गळतीमुळे चार कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी ५.१३ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. यात दोन पुरुष आणि दोन महिला असे एकूण चार जण भाजले आहेत. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्व जखमींना ऐरोली येथील बर्न सेंटर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सस्मिरा संस्थेच्या चाचणी विभागातील मशीनमधून रसायन गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे.