मुंबईत गोवरचे दिवसभरात १२ रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत गोवरचे दिवसभरात १२ रुग्ण
मुंबईत गोवरचे दिवसभरात १२ रुग्ण

मुंबईत गोवरचे दिवसभरात १२ रुग्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईत गोवरची साथ वेगाने पसरत असून रुग्णांची संख्या १६४ वर पोहोचली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार शहर व उपनगरात दिवसभरात १२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
ताप व पुरळ असलेल्या एकूण सात संशयित रुग्णांचे मृत्यू झाले असून मृत्यू पुनर्विलोकन समितीमार्फत अहवाल प्राप्त झाल्यानंतर या मृत्यूंचे निश्चित निदान प्राप्त होईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गोवरच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवलीत दोन खाटा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना तसेच राजावाडी रुग्णालयात पाच खाटा, शताब्दी रुग्णालय गोवंडीत गंभीर रुग्णांसाठी १० खाटा आणि कस्तुरबा रुग्णालयात ८३ खाटा अतिगंभीर रुग्णांना उपचारासाठी, दाखल करण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच कस्तुरबा रुग्णालयात पाच व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

...
वर्ष-२०२० -२०२१-२०२२
ताप, पुरळचे रुग्ण २७९-४०८-१०७९
निदान झालेले गोवरचे रुग्ण २५-९-१६४
...

गोवरचा उद्रेक असलेले विभाग
एम पूर्व, ई, एफ उत्तर, जी दक्षिण, एल, एम पश्चिम, पी उत्तर, एच
...
रुग्णांची स्थिती
ऑक्सिजनवरील रुग्ण- ४
संशयित मृत्यू- ७
दिवसभरात बरे झालेले रुग्ण- २९
दिवसभरात निदान झालेले रुग्ण- १२
...
सर्वेक्षणाचा अहवाल
एम पूर्व विभागातील एकूण घरांचे सर्वेक्षण १,३३,३९७
मुंबईतील एकूण घरांचे सर्वेक्षण १३,४९,१३२