गौतम नवलखा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौतम नवलखा यांची 
सर्वोच्च न्यायालयात धाव
गौतम नवलखा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

गौतम नवलखा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेले गौतम नवलखा यांच्या नजरकैदेतील घराला आक्षेप घेतल्याबद्दल नवलखा यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. शुक्रवारी यावर सुनावणी होणार आहे.
नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाने घरामध्ये नजरकैदेत राहण्याची परवानगी दिली आहे. याबाबत सर्व कार्यवाही बुधवारी विशेष न्यायालयात पूर्ण करण्यात आली. अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी हमीदार म्हणून नवलखा यांच्यासाठी अर्ज दिला आहे; मात्र आता सुरक्षेचे कारण देऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुन्हा त्यांच्या घराला विरोध केला आहे. नवलखा ज्या ठिकाणी राहणार आहेत, ते कम्युनिस्ट पक्षाच्या वाचनालयातील निवासस्थान आहे, त्यामुळे याला तपास यंत्रणेने विरोध केला आहे.
नवलखा यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी याबाबत माहिती देण्यात आली. कॉम्रेड बी. टी. रणदिवे स्मृती ट्रस्ट इमारतीमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. तपास यंत्रणा जाणीवपूर्वक नवलखा यांना रखडवून कारागृहात ठेवत आहे, जागेची तपासणी यापूर्वी करायला हवी होती, असा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने यावर शुक्रवारी तातडीने सुनावणी निश्चित केली आहे.
---
सीसी टीव्हीची देखरेख
एनआयएनेदेखील या जागेला विरोध केला असून स्वतंत्र अर्ज केला आहे. या ठिकाणी नवलखा यांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. नवलखा यांना एक महिना घरामध्ये अटकेत ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यावर सीसी टीव्हीची नजर असणार आहे. तसेच सोशल मीडिया आणि मोबाईल वापरण्याची मनाई आहे.