आरोपींच्या सहभागाबाबतचा तपशील द्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोपींच्या सहभागाबाबतचा तपशील द्या!
आरोपींच्या सहभागाबाबतचा तपशील द्या!

आरोपींच्या सहभागाबाबतचा तपशील द्या!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १७ : अँटिलिया स्फोटक प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात किती आरोपी कशा प्रकारे सहभागी आहेत, याचा तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) नुकतेच दिले. या प्रकरणात अटकेत असलेले माजी पोलिस निरीक्षक तथा एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि निलंबित पोलिस रियाझुद्दीन काझी यांनी जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. यावर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या खटल्यात शर्मा आणि काझी दोघे आरोपी आहेत. सुनावणीवेळी शर्माचा या प्रकरणात काय सहभाग आहे, असा प्रश्न खंडपीठाने विचारला. यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले, की हत्येच्या संपूर्ण कारस्थानात शर्माचा सहभाग आहे. सर्व आरोपींना यातील घटनांची पुरेशी कल्पना होती असे सिंह यांनी सांगितले.

निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझेचा यामध्ये काय सहभाग आहे, तो एकटा हे सर्व करू शकणार नाही, मग त्याच्याबरोबर आणखी कोण यामध्ये होते, वाझे हत्येच्या ठिकाणी कसा पोहोचला, तो काही चालत आला नसेल, मग जर हे सर्व कटकारस्थान असेल तर ते कसे होते, असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले. पुढील गुरुवारी (ता. २४) याबाबत बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.